शास्त्रीय संगीताचे भविष्यातले कार्यक्रम

कार्यक्रमाची सुरुवात करताना सगळे कलाकार मंचावर बसतील, आणि अतिशय कृत्रिम आणि बोजड भाषा वापरून ओळख करून देण्यात येईल. जितकी विशेषणं जास्ती तितकं उत्तम. भाषा छापील. कलाकारांची ओळख, संस्थेची माहिती, जुने कार्यक्रम, पुढील कार्यक्रम, सदस्यांची भाषणं, अध्यक्षांचं भाषण इत्यादी महत्वाच्या गोष्टी १५ मिनिटात संपतील आणि पहिलं मध्यंतर घोषित होईल. ते दीड तास चालेल. 

त्यात वाईन पासून सुरुवात होऊन उत्तम ७-कोर्स जेवण असेल. 

तदनंतर १० मिनिटांचं गाणं होईल, आणि दुसऱ्या मध्यंतराची घोषणा.

हे मध्यंतर मात्र फक्त १ तास चालेल आणि त्यात सर्व लाईट गोष्टी सर्व्ह करण्यात येतील. पहिल्या आणि दुसऱ्या मध्यंतराच्या मेन्यू मध्ये आणि गायकाच्या मनात जसा कार्यक्रम सादर करावा ही कल्पना, यात साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा. 

शेवटी पाच मिनिटांची भैरवी आणि नंतर दहा मिनिटांचा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम होईल, आणि जनसमुदाय उत्साही मुद्रेने घरी जाईल. 

असा प्रयोग करून बघायला काय हरकत आहे?


Comments

Popular posts from this blog

शब्द बापुडे केवळ वारा

टाळ्या आणि टाळ्या (हशा मात्र मनातल्या मनात)

न केलेल्या रिक्षा (सहज सुचलं म्हणून)