Posts

 बने बने  काय म्हणतीयस काय बने. आता या वयात परत युनिव्हर्सिटी मध्ये जाणार. बने, तुझ्या जिद्दीचं कौतुक करावं तितकं थोडंच. पण आता कुठल्या डिग्र्या पाहिजेत. काय म्हणालीस, फक्त १०० डॉलर फी आहे. बने या फी मध्ये तुला कोण काय शिकवणार.  अच्छा, ही नाटकातली डिग्री आहे. पण बने, कुठली ही युनिव्हर्सिटी? अच्छा, कला? बने, म्हणजे "कलेकरता कला", "मनोरंजन म्हणजे नीच पातळी", "चार डोकी आली नाटकाला की काम झालं", "हाउसफुल झाल्यास सपशेल पराभव", "नाटक जितकं कमी चालेल तेव्हढी आमची मान वर आणि गर्वभरी छाती" या पाटील/मराठे आणि भागवत संप्रदायात तू सामील होणार की काय? म्हणजे आमच्या डोक्यावर मिरे वाटणार तर.  काय म्हणालीस? वाटवे सर आहेत तिथे? असू देत असू देत. तू आपली काळजी घे बने. मधून मधून घेतलं शिंगावर, अश्रूंची झाली फुले वगैरेची प्रॅक्टिस चालू ठेव. "सSSSSSर" हा त्यातला डायलॉग एकदम घाणेकरी ढंगात म्हणत रहा. काय म्हणालीस? घाणेकर सर पण आहेत? असूदेत असूदेत. हे नवीन घाणेकर माहिती आहेत. ते पण भागवत संप्रदायी आहेत. त्यांच्यापासून जपून रहा. बाकी वाडेकर वगैरे मंडळी...

शब्द बापुडे केवळ वारा

शब्द बापुडे केवळ वारा  भाषा आणि शब्द सारखे बदलत असतात .    काही शब्द लिहिले जातात पण कधीच बोलले जात नाहीत.  "व". आपण "आणि" म्हणतो. मी व तू असं कोणी म्हणत नाही. "देखील" हा पण जवळपास तसाच, पण काही लोकं म्हणतात. पूर्वीच्या लिखाणात "करावयाचे, लिहावयाचे" असे शब्द वारंवार येत असत. तेही उच्चारले जाणारे नव्हते. मोद हा आनंद या अर्थाचा शब्द कोणी उच्चारलेला माझ्या ऐकिवात नाही. क्षुधा म्हणजे भूक. म्हणताना भूक, लिहिताना भूक किंवा क्षुधा. गोडसे भटजींनी लिहिलेलं पुस्तक आहे त्यात "मजला क्षुधा नव्हती" असा उल्लेख आहे.  आणखी एक गडबड करणारा शब्द म्हणजे मैलाचा दगड. दोन शब्द आहेत. पण मला अजिबात आवडत नाहीत. इंग्रजी milestone हा खडबडीत अनुवाद आहे. मैलाचा दगड हे मराठी भाषेतून हद्दपार होईल तो दिवस मैलाचा दगड म्हणून साजरा करायला हरकत नसावी.  मागे एकदा कुठेतरी जेवायला गेलो होतो तेव्हा "आता जेवणाला न्याय द्या" हे शब्द ऐकल्यावर मी त्याऐवजी माझ्या व्हिस्कीला न्याय द्यायचं ठरवलं.  "प्रस्तुत लेखक" हे अजून एक! This writer चं शब्दशः भाषांतर. सुदैवाने ...

मराठी असे (कधी कधी ) आमुची मायबोली

 मराठी असे (कधी कधी ) आमुची मायबोली  हल्ली मी जी मराठी वाचतो ती कुठली भाषा आहे हा प्रश्नच पडतो. भाषा प्रवाही असावी हे मान्यच आहे. पण त्या प्रवाहाचा नको इतका खळखळाट होतो आहे. इथे हे स्पष्ट करतो की बोलीभाषांबद्दल अजिबात आक्षेप नाही. बोलीभाषा या मराठीला समृद्ध करतात.  पण, पण, पण .... "हे मिक्सरला वाटून घ्या " "हे मायक्रोवेव्हला ठेवा" "हे फ्रीझरला ठेवा" हे काय? "मध्ये" हा शब्द सगळे विसरले की काय? आता हे बघा .   "४११ बॉडी फॅट लॉस डाएट हा सामान्यतः चरबी कमी करण्यासाठी “संरचित दृष्टिकोन” म्हणून ओळखला जातो, जो मॅक्रोन्यूट्रिएंट्सच्या विशिष्ट गुणोत्तराभोवती किंवा कॅलरी सायकलिंग स्ट्रॅटेजीभोवती फिरतो. ‘४११’ मागे असलेली मुख्य कल्पना म्हणजे व्यक्तींना अनुसरण्यासाठी एक सरळ फ्रेमवर्क तयार करणे. हे नवीन लोकांसाठी कमी भीतीदायक आणि अधिक शाश्वत आहे,” असे पोषणतज्ज्ञ, आरोग्य प्रशिक्षक आणि गुटअवतार आणि इनूएनच्या संस्थापक आणि द गटच्या लेखिका पायल कोठारी म्हणाल्या." "अळूची पाने आपल्या आहारात वापरण्यापूर्वी त्यांना गरम पाण्यात उकळण्याची शिफारस केली जाते. ...

हम नहीं सुधरेंगे

हम नहीं सुधरेंगे  They say that travel makes you wise. In Marathi, we say "केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार" etc etc. I wholeheartedly agree. For example, I got supreme music coaching due to this. No, I am not talking about spending time with गुणीजन. That cannot even closely match what I learned. Our गुणीजन folks have not achieved this level yet.  So, Emirates Airlines was my Guru. They imparted this precious knowledge, and I am eternally grateful.  First of all, they told me this.  "We offer you our latest selection of spellbinding Ragas and Taals". Wow, not only Ragas but Taals too. Amazing. So, I looked further with full expectations of getting into a "spellbound" state.  The first page was relatively okay. Hari Prasadji, Ravi Shankar—all fine. Except they had said Raga Mishra Ghara. Now, for a while, I thought they were talking about me! I am "ghara" or have blue eyes. But that is okay; it is Gara.  The next page featured "Khamaj ...

दोन गाणी, पूर्ण वेगळी, तरीही सारखी

तू अबोल होऊन, जवळी मजला घ्यावे हे पहिलं गाणं, आणि घन तमी, शुक्र बघ राज्य करी हे दुसरं. कृष्णा कल्ले, श्रीनिवास खळे, गुरुनाथ शेणई आणि भा रा तांबे, हृदयनाथ मंगेशकर आणि लता मंगेशकर.  तसं म्हणलं तर काहीही साधर्म्य नाहीये. पण तरीसुद्धा आहे. मी तू अबोल होऊन, जवळी मजला घ्यावे हे गाणं ऐकून पेटीवर बसवण्याचा प्रयत्न करत होतो (https://youtu.be/tTZJKdiOxsI) तेव्हा माझ्या लक्षात आलं की या दोन गाण्यांच्या इंटरल्यूड म्युझिक मध्ये खूप साम्य आहे. ऐकून बघा. https://www.youtube.com/watch?v=q8O9-Smih44 आणि https://www.youtube.com/watch?v=N0p43HW_LBA खळे साहेब आणि हृदयनाथ, दोघेही तुल्यबळ, एकमेकांना अतिशय मानणारे. दोन्ही गाणी अतिशय सुंदर.  मला असं वाटतं की बहुधा दोन्ही गाण्यांची साऊंड अरेंजमेंट एकाच व्यक्तीने केली असावी. अनिल/अरुण किंवा फक्त अनिल मोहिले.

डॉक्टर वाकडे

मनोज नक्की साठ वर्षांचा झाला का? कोण जाणे. पण त्याच्यात साठ असूदे किंवा सतरा असूदे, काही फरक नाहीये. याच्या अंगावर काहीही मास चढत नाही, कधीच. त्यामुळे श्री विवेक दातार, श्री अतुल फणसे, श्री उदय राजे वगैरे लोकं खार खाऊन असतात. च्यायला आम्ही नुसता श्वास घेतला तरी वजन वाढतं! असो. याबद्दल फार खोलात न शिरणं इष्ट.  तर मनोजचा आज वाढदिवस. सतरावा किंवा साठावा :-)  मी, मनोज आणि सुनील घट्ट मित्र. मनोज आणि सुनील यांच्याबाबत बायोलॉजी हा आवडता विषय (याचा "बाया" या शब्दाशी संबंध नाही) आणि मला तो पूर्ण अप्रिय (अर्थात मला बाया प्रिय, पण असो .....). बारावी नंतर आवश्यक ती ताटातूट झाली, मनोज आणि सुनील त्यांच्या विषयाकडे गेले. मी फारकत घेतली.  मनोजचं एक लक्षण म्हणजे हा प्राणी शाळेच्या पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत अगदी कंसिस्टंटली तेव्हडाच अभ्यास करायचा. आम्ही सगळे जण आधी टिवल्या बावल्या, मग टेन्शन या अवस्थेतून जायचो. मनोजच्या बाबतीत हे शक्य नव्हतं.  बारावीच्या परीक्षेनंतर मी, सुनील आणि मनोज; का कोण जाणे; VT ला जाऊन फोर्ट मध्ये भटकून आलो होतो. त्यानंतर VT स्टेशनच्या वरती एक कॅफ...

टाळ्या आणि टाळ्या (हशा मात्र मनातल्या मनात)

टाळ्या आणि टाळ्या (हशा मात्र मनातल्या मनात)  टाया वाजविती पानं  दंग देवाच्या भजनी  अशी एक बहिणाबाईंची कविता आहे. त्यात झाडांची पानं देवाचं भजन करत आहेत अशी कल्पना आहे. प्रत्यक्षात आपण टाळ्या वेगळ्याच कारणाकरता वाजवतो, आणि अपेक्षा करतो. फक्त टाळ्यांकरता वरचा सा लावून ठेवणारे गायक टाळ्या मिळाल्याशिवाय थांबत नाहीत. एखादा वक्ता सहजपणे म्हणतो, की मला आज इतक्या टाळ्या मिळाल्या. पुण्यासारख्या ठिकाणी (बापरे, आता मी मेलो) रटाळ गाणं किंवा भिकार भाषण चालू असेल तर लोक टाळ्या वाजवतात.  पण लोकं आरतीला टाळ्या वाजवतात त्या मात्र असतात देवाकरता, पण अनेकांचं मनोरंजन करण्याची क्षमता असते!  वानगीदाखल काही उदाहरणं घेऊ.  टाळ्या वाजवताना कुठला हात हलतो आणि कुठला अचल राहतो? काही लोक उजवा तर काही डावा अचल ठेवतात. काही दोन्ही हात हलवतात! हे तरी ठीक आहे, पण टाळ्या निदान लयीत वाजवाव्या! तर तेही नाही. अनेक लोक एकदम रँडम टाळ्या वाजवत असतात. चालू असलेली आरती, तिची लय, त्यातले शब्द यांच्याशी संपूर्ण फटकून! म्हणजे नवीन निश्चल, भारत भूषण वगैरे लोकांचा अभिनयाशी होता तितकाही नाही. गाण्यातल्या...