अप्रतिम, एकमेवद्वितीय, सुंदर, सुरेख, अभिनयसंपन्न, प्रतिभावंत मराठी मालिका
सध्या मी ठाण्यात आहे. त्यामुळे दोन मराठी मालिका बघायची वेळ आली आहे. दोन्ही मालिका एकदम तोडीस तोड आहेत. ही वाईट की ती वाईट, जोरदार स्पर्धा.
माझा गोंधळ वेगळाच आहे. पहिली केव्हा संपते आणि दुसरी केव्हा चालू होते याबद्दल माझ्या डोक्यात प्रचंड गोंधळ आहे. त्यामुळे मी दुसऱ्या मालिकेतल्या पात्राचा पहिल्या मालिकेशी संबंध जोडत बसतो आणि डोक्यात पूर्ण चुथडा. शेवटी मी एकदा ठरवलं की घड्याळ लावून, TV कडे पूर्ण लक्ष देऊन दोन्ही मालिका बघायच्या. तेव्हा लक्षात आलं की एकच मालिका बघितली तरीसुद्धा पात्रांचा एकमेकांशी संबंध नसतोच. आता मालिकांची नावं ही आहेत.
आई रंग कुठे माझा काय वेगळा करते
Comments
Post a Comment