लता
लता मंगेशकर.
लताबाई गेल्या म्हणजे नक्की काय झालं? तशा त्या फिल्मी दुनियेपासून गेली कित्येक वर्ष दूरच होत्या. त्या कधी ना कधीतरी जाणार हे माहीतच होतं. त्यांचं काहीच नुकसान झालं नाही. त्या अलिप्त आणि शांत होत्या. नुकसान आपलं आहे.
End of an era, यासम हीच वगैरे शब्दप्रयोग घासून गुळगुळीत झाले आहेत. परंतु लता मंगेशकर या एका परिसाचा स्पर्श झाला की ते शब्द झळाळून उठतात.
त्यांच्या गाण्याबद्दल मी काय लिहिणार? फार पूर्वी मी लिहिलं होतं. लताबाईंचं कुठलाही गाणं घ्या. त्यात कमीत कमी एक जागा अशी असते की फक्त लताबाईच ती जागा गाऊ शकतात. बाकी ते "येऱ्याबगळ्याचं काम नोहे".
आपल्या पिढीचं भाग्य म्हणजे आपण लताबाईंच्या पिढीत कुठेतरी होतो. आपण त्यांना प्रत्यक्ष पाहिलं, ऐकलं.
लताबाई आणि त्यांचा सूर हे अमर आहेत. त्यांना कुणीही स्पर्श करू शकत नाही. यम सुद्धा नाही.
लता मंगेशकर! लता मंगेशकर! लता मंगेशकर!
Comments
Post a Comment