आडाचौताल : एका तालाची कहाणी

आडाचौताल : एका तालाची कहाणी 

ही आडाचौतालाची कहाणी आहे! माझ्यासारख्या एका सामान्य श्रोत्यांचा नजरेतून. 

मी सत्तर/ऐंशीच्या दशकात शाळा/कॉलेज मध्ये असताना पेटी शिकत होतो, गाणी ऐकत होतो, ठाण्यात वाढल्यामुळे आमची शाळा (मो ह विद्यालय) आणि नंतर गडकरी रंगायतन इथे नाटकं पहात होतो. पण आडाचौताल काही तेव्हा फारसा प्रचलित नव्हता. नाही म्हणायला कट्यार मधलं एक पद होतं (कवन देस कवन नगरियामे, https://www.youtube.com/watch?v=GYuY7gLQIEM), पण आडाचौताल  बैठकीत कधी गायला जात नसे.  नाट्य संगीतात सुद्धा हे एक पद सोडल्यास आडाचौताल आठवत नाही. राजीव परांजपे सारखे दिग्गज लोकं जास्त सांगू शकतील. 

ऐंशीच्या दशकात कानपूरहून वीणाताई पुण्याला आल्या, आणि इतर अनेक गोष्टींबरोबर त्यांनी आडाचौताल आणला. आणि मैफिलीत  वेगळाच रंग भरला. वीणाताई या तालात बंदिशी, तराणे तर गायच्याच, पण त्रितालात फिरावं तसं मोकळेपणानी फिरायच्या. आम्ही तेव्हा अचंबित झालो. मला असं वाटतं की तेव्हापासून तो जास्ती रुजायला सुरुवात झाली. 

त्यानंतर अश्विनीताई आणि त्यांच्या शिष्या आता अगदी सर्रास गातात. अश्विनीताईंनी अतिशय सुंदर बंदिशी बांधल्या आहेत.  शिवाय नवीन पिढीमध्ये कलाकार उत्तम बंदिशी/तराणे बांधून सादर करत आहेत. सुरेशजींची एक अतिशय सुंदर youtube लिंक (https://www.youtube.com/watch?v=nh0QLvHJtcs) उपलब्ध आहे त्यात त्यांनी तालाचं विवेचन केलं आहे, आणि नंदू कुलकर्णी यांनी ही मुलाखत  घेतली आहे. सुरेशजी स्वतः आणि त्यांचे शिष्य यांची कत्थक बरोबरची एक लिंक (https://www.youtube.com/watch?v=cEDFjhsy05Y) पण आहे, मला वाटतं शाम्भवी दांडेकर त्यात आहे आणि रघुनंदन पणशीकर. पंडित स्वपन चौधरींनी या तालात उत्कृष्ट सोलो वादन केलं आहे त्याची रेकॉर्ड उपलब्ध आहे. 

पण महाराष्ट्रात हा ताल रुजवायला सुरुवात वीणाताईंनी केली. हा माझा दृष्टिकोन आहे. सर्वांना पटेलच असं नाही. पण आडाचौताल आता जास्ती प्रचलित झाला आहे यावर मतभिन्नता नसावी.  

हा चाळीस वर्षांचा गोषवारा आहे. एखादा अवघड  ताल रुजून रुळायला मला वाटतं इतका वेळ लागणं ही नॉर्मल गोष्ट असावी. 


Ada Chautal: Journey of a Taal

This is Ada Chautal's journey into (almost) mainstream. For a common listener like me, this is fascinating. 

While I was growing up, in the 70s and 80s, I had great opportunities to listen to "Diggaj"  artists,  including musical dramas (Sangeet Natak). In Thane, where I grew up, we had good theater (M. H. Highschool, my school, and later Gadkari Rangaytan). Therefore we did not have to travel to places like Shivaji Mandir. Of course, other theaters in Thane/Mulund came much later. In any case, Ada Chautal was not common at all. Even in Natya Sangeet, I remember just one "pad" from Katyar (Kavan Des Kavan Nagariyame https://www.youtube.com/watch?v=GYuY7gLQIEM). Ada Chautal was conspicuously absent. Shree Rajeev Paranjape, Natya Sangeet "Bujurg" can shed more light on Sangeet Natak. 

Veenatai moved from Kanpur to Pune in 80s and stormed into the elite musical circles. Amongst other things,  she brought in Ada Chautal. She would sing Ada Chautal compositions like it was a normal Teentaal!  And all of us were simply astonished.

These days, Ashwitai and her disciples commonly sing Ada Chautal bandishes. In fact, Ashwinitai has composed outstanding bandishes/taranas in it. Pandit Dinkar Panshikar has done exactly the same. Sureshji has given the full treatment with succinct Ada Chautal explanation, the way only he can do! Thanks to Nandu Kulkarni, the interviewer (https://www.youtube.com/watch?v=nh0QLvHJtcs). We also have a youtube link (https://www.youtube.com/watch?v=cEDFjhsy05Y) where Sureshji himself and his disciples are accompanying Kaththak, I believe Shambhavi Dandekar is on stage, along with Raghunandan Panshikar. Pandit Swapan Choudhari has a superb solo piece, recorded in the early 90s. 

But I believe it was Veenatai who was the towering figure responsible to get this going at least in Maharashtra. Of course, there can be disagreements. However, we all will be in agreement that Ada Chautal has become much more prominent these days. 

This is 40 years span! I would assume that this is about right for a difficult Taal to get acceptance throughout the length and breadth of artists and listeners. 

Comments